Karnataka Love Jihad : मंड्या (कर्नाटक) येथे १५ वर्षांच्या हिंदु मुलीला मुसलमान तरुणाने पळवले !

मंड्या (कर्नाटक) – येथील के.आर्. पेटे गावात १५ वर्षांच्या हिंदु मुलीला १९ वर्षांच्या सय्यद तबरेज या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. या प्रकरणी हिंदु संघटनांनी लव्ह जिहादचा आरोप करत येथे आंदोलन केले. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर पोलिसांनी मुलगी आणि तरुण यांना शोधून काढले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावे, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे हवेच; मात्र त्यासह हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !