१. आनंदी
श्री. संजय ठाकूर नेहमीच आनंदी आणि उत्साही असतात.
२. नम्र
त्यांच्या बोलण्यात नम्रता जाणवते.
३. साधनेची ओढ
ते पहाटे ४.३० वाजता उठून नामजप करतात. ते अधूनमधून ‘कुठला नामजप करायला हवा ?’, हे उत्तरदायी साधकांना विचारतात. त्यांच्या घरातील वातावरणही आध्यात्मिक आहे.
४. सेवेची ओढ
४ अ. उपक्रमात सहभागी होणे : ते हिंदु जनजागृती समितीकडून केल्या जाणार्या उपक्रमात नेहमी सहभागी होतात. ते ‘शासकीय कार्यालयात निवेदने देणे किंवा विविध प्रकारची आंदाेलने’ यांसाठी स्वतः उपस्थित रहातात आणि इतरांनाही समवेत घेऊन येतात.
४ आ. धर्मजागृती करणे : ते हिंदु व्यापार्यांना संपर्क करून त्यांना धर्मजागृतीविषयी संदेश पाठवतात.
५. धर्मकार्याची तळमळ
५ अ. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे : ते सनातन-निर्मित पंचाग, सात्त्विक उत्पादने, विशेषांक इत्यादी गोष्टी स्वतः घेतात आणि समाजातही त्याचे वितरण करतात.
५ आ. त्यांनी आतापर्यंत ‘हलाल जिहाद’च्या १०० ग्रंथांचे वितरण केले आहे.
५ इ. सेवाकेंद्रासाठी अर्पण देणे : त्यांचा लाकडी घाण्यावरील तेल काढण्याचा व्यवसाय आहे. ते प्रतिमास अकोला येथील सेवाकेंद्रासाठी तेल आणि थोडे किराणा सामान अर्पण देतात.
५ ई. व्यापार्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याचे ध्येय ठेवणे : ते स्वतः नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात. त्यांनी सर्व व्यापार्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याचे ध्येय ठेवले आहे.
५ उ. जून २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला येतांना विमान चुकल्यावर अधिक पैसे भरून दुसर्या विमानाने येणे : जून २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला) जाण्यासाठी त्यांनी विमानाचे तिकीट काढले होते. ते बाहेरगावी असल्याने त्यांना विमानतळावर पोचायला उशीर होऊन त्यांचे विमान चुकले. त्यांनी लगेच अधिकचे पैसे भरून दुसर्या विमानाचे तिकीट काढले आणि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी गोव्याला आले. यावरून त्यांची धर्मकार्यासाठी असलेली तळमळ दिसून येते. ते हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रत्येक अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करतात.
६. प्रखर धर्मनिष्ठा
६ अ. श्री. संजय ठाकूर यांच्या कारखान्यात कपाळाला गंध लावून आणि अंगावर गोमूत्र शिंपडूनच प्रवेश दिला जात असणे : श्री. संजय ठाकूर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यांच्या निवासस्थानाला लागूनच त्यांचा ‘जानकी सीड्स’ नावाचा बी-बियाणांचा कारखाना आहे. त्या कारखान्याला शालेय विद्यार्थी किंवा अभ्यासक शिकण्याच्या दृष्टीकोनातून भेट देतात. त्यांनी कारखान्यात प्रवेश करण्यापूर्वी ‘प्रत्येकाने कपाळाला गंध लावून आणि अंगावर गोमूत्र शिंपडूनच आत जावे’, असा नियम केला आहे. जे असे करणार नाहीत, त्यांना कारखान्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे केवळ हिंदूच कारखाना पहाण्यासाठी जाऊ शकतात. ते म्हणाले, ‘‘अंगावर गोमूत्र शिंपडणे आणि गंध लावणे’, ही सनातनचीच शिकवण मी येथे अंमलात आणली आहे.’’
६ आ. ‘हिंदूंनी हिंदूंकडूनच सर्व वस्तूंची खरेदी करावी’, यासाठी केलेले प्रयत्न : हिंदूंनी कुठलेही साहित्य हिंदूंकडूनच खरेदी करावे’, यासाठी ते समाजात प्रबोधन करतात. त्यासाठी त्यांनी ‘विश्व हिंदु व्यापार संघ’ या नावाने एक संघटना स्थापना केली आहे. हिंदु व्यापार्यांना या संघटनेचे सभासद करून त्यांना फळे, धान्य इत्यादी गोष्टी अल्प मूल्यात घाऊक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातात. ‘हिंदु व्यापार्यांनी त्या वस्तू पुढे केवळ हिंदूनाच बाजारापेक्षा अल्प मूल्याने वितरण कराव्यात’, या उद्देशाने ते हा उपक्रम राबवत आहेत.
६ इ. ते हिंदु व्यक्तीला रोजगार मिळवून देतात.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार आपत्काळाची सिद्धता करणे : श्री. ठाकूर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार आपत्काळाची सर्व प्रकारे सिद्धता केली आहे, उदा. त्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याचे नियोजन केले आहे, गोबरगॅस आणि ‘सोलर’ यांवर दिवे अन् पंखे लावून घेतले आहेत, तसेच गोपालनही केले आहे. औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या निवासस्थानालगत औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.
७ आ. औषधी वनस्पतींचा अभ्यास करून काही औषधे सिद्ध करणे : त्यांनी ‘कुठल्या वनस्पतीचा उपयोग कुठल्या व्याधीवर आणि कसा करायचा ?’, याचा अभ्यास केला असून ते काही आयुर्वेदाची औषधे स्वतःच सिद्ध करतात. ते प्रतिदिन ५१ औषधी वनस्पतींच्या पानांचा रस करून स्वतः घेतात आणि समाजात त्याचे वितरणही करतात. त्या रसाचे त्यांनी ‘अमृतरस’ असे नामकरण केले आहे.
८. भाव
अ. श्री. संजय ठाकूर यांच्या मनात गुरुदेव, सनातनचे आश्रम आणि साधक यांच्याविषयी पुष्कळ भाव जाणवतो, तसेच त्यांच्यात साधकांना साहाय्य करण्याचा भावही पुष्कळ जाणवतो.
आ. त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांनी ध्यान आणि नामजप करण्यासाठी ‘पिरॅमिड’च्या आकाराचे ध्यानमंदिर बनवले आहे. ११.५.२०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव साजरा होणार होता. त्या दिवशी त्यांनी त्या ध्यानमंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवून त्याचे पूजन केले.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३)