पुणे – लोणावळ्यात लोकलच्या फेर्या पूर्ववत् कराव्यात, तसेच एक्सप्रेस गाड्यांसाठी लोणावळा रेल्वेस्थानकात थांबा करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ जानेवारीला सकाळी ‘रेल्वे रोको आंदोलन’ करण्यात आले. लोणावळा रेल्वेस्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली. आंदोलक रेल्वे रूळावर उतरले होते. डेक्कन क्वीनच्या समोरून आंदोलक बाजूला होत नसल्याने रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. ‘डेक्कन क्वीन’ रोखल्यामुळे मुंबईकडे जाणार्या इतर गाड्या काही काळ विलंबाने धावल्या. या आंदोलनाचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही.
खासदार, आमदार यांनी फिरवली आंदोलनाकडे पाठ !या आंदोलनाकडे मावळचे खासदार, मावळचे आमदार आणि माजी आमदार, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी पाठ फिरवली. जागरूक नागरिक हे आंदोलन करत असतांना लोकप्रतिनिधी मात्र त्याकडे फिरकले नाहीत. |