Professor Hand Arrest: ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात कापणार्‍या धर्मांध मुसलमानाला १३ वर्षांनंतर अटक !

इस्लामचा अपमान केल्याचे प्रकरण !

प्राध्यापक टी.जे. जोसेफ

कोची (केरळ) – इस्लामचा कथित अपमान केल्याच्या प्रकरणी केरळचे प्राध्यापक टी.जे. जोसेफ यांचा हात कापणारा सवाद याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने.) ९ जानेवारी २०२४ या दिवशी कह्यात घेतले आहे. १३ वर्षांनंतर त्याला कह्यात घेण्यात अन्वेषण यंत्रणेला यश आले. सवाद याला पकडून देणार्‍याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे घोषित केले होते. ४ जुलै २०१० या दिवशी केरळचे प्राध्यापक टी.जे. जोसेफ यांचा हात कापण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य सवाद पसार होता.

धर्मांध

‘एन्.आय.ए.’ला सवाद कन्नूरजवळील मत्तनूर येथे असल्याची माहिती मिळाली. यानंतर ‘एन्.आय.ए.’ने तो रहात असलेल्या घरावर धाड घालून त्याला कह्यात घेतले. सवाद हा गेल्या ५ महिन्यांपासून पत्नी आणि त्याची २ मुले यांच्यासह येथे रहात होता.

संपादकीय भूमिका

एका प्राध्यापकाचा हात कापणार्‍या धर्मांधाला अटक करण्यासाठी १३ वर्षांचा अवधी घेणार्‍या भारतीय सुरक्षायंत्रणांच्या कार्यक्षमतेवर कुणी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यास आश्‍चर्य ते काय ?