Tanee Sangrat : श्रीराममंदिराचे उद्घाटन सर्वांसाठी आनंदाची गोष्ट !

अमेरिकेतील थायलंडचे राजदूत तनी संग्राट यांचे प्रतिपादन !

थायलंड येथे रामायण

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथे ‘रामायण अक्रॉस एशिया अँड बियॉन्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अमेरिकेतील थायलंडचे राजदूत तनी संग्राट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, श्रीराममंदिराचे उद्घाटन ही अनेक देशांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ही केवळ थायलंडच्या लोकांसाठी नाही, तर दक्षिण-पूर्व आशिया आणि आशिया-प्रशांत महासागर या क्षेत्रांतील लोकांसाठीही आनंदाची गोष्ट आहे.


अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री. श्री ठाणेदार यांनी म्हटले की, हा एक  ऐतिहासिक आणि प्रत्येक भारतियासाठी अभिमानाचा क्षण आहे. मी श्रीराममंदिराची छायाचित्रे पाहिली आहेत, ती पुष्कळ छान आहेत. रामायणाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्र आणत आहोत. हे एक सांस्कृतिक बंधन आहे.