अहिल्यानगर – नवनाथांच्या दिव्यत्वाची प्रचीती आजच्या संगणक युगातही श्रद्धावंतांना मिळते; म्हणूनच नवनाथांच्या साधनास्थळी, तपस्थळी, संजीवन समाधीस्थळी श्रद्धावंत भाविकांच्या गर्दीचा ओघ विनाखंड चालू आहे. वारकरी संप्रदायाचा भगवा खांद्यावर घेतलेले वारकरी आम्ही मूळ नाथसंप्रदायीच हे मोठ्या अभिमानाने सांगतात, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक श्री. मिलिंद चवंडके यांनी केले. येथील दिल्लीगेट जवळील श्री नाना महाराज मंदिरात चालू असलेल्या २३१ व्या अखंड हरिनाम संत परंपराविश्वातील सर्व संप्रदायांच्या गुरुस्थानी नाथसंप्रदाय मानला जातो.
१. नवनाथांचे उपास्यदैवत आदिनाथ म्हणजे साक्षात् भगवान शंकर असून मत्स्येंद्रनाथ-गोरखनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ अशी ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ही परंपरा कीर्तनकार आणि प्रवचनकार मोठ्या अभिमानाने सांगतात. माऊलींनी हरिपाठातही ही परंपरा सांगून वारकरी संप्रदाय नाथांचा आहे, याकडे लक्ष वेधले आहे.
२. मानवी शरिरास होणारे ताप, व्याधी, आजार, दुःखे, संकट निवारण करण्याचे उपाय नवनाथांच्या शाबरी विद्येनेच आपल्यासमोर ठेवले आहेत.
३. आजच्या कलीयुगात शाबरी विद्येसारखी तात्काळ फलदायी विद्या कोणतीच नाही. नवनाथांचे शाबरी मंत्र पुष्कळ जाज्वल्य आणि प्रभावी आहेत.
४. नगर जिल्ह्यामधील विविध स्थळे नवनाथांनी पावन करत येथे नाथभक्तीचा मळा फुलवला. येथील नाथांची पावन स्थाने गजबजलेली दिसतात ते आजही या स्थानांमधून मिळत असलेल्या शक्तीमुळेच.