Badruddin Ajmal: (म्हणे) ‘२० ते २६ जानेवारी या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी घरीच रहा !’  

आसाममधील खासदार बदरूद्दीन अजमल यांचे मुसलमानांना आवाहन !

गौहत्ती (आसाम) – ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (ए.आय.यु.डी.एफ्.) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार बदरूद्दीन अजमल यांनी मुसलमानांना ‘२०  ते २६ जानेवारी या काळात घरात रहा. रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या काळात रेल्वेतून प्रवास करणे टाळा’, असे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपला इस्लाम धर्मविरोधी असल्याचेही म्हटले आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते.

बदरूद्दीन अजमल

भाजप मुसलमानांचा द्वेष करत नाही ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

खासदार बदरूद्धीन अजमल यांच्या विधानावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, भाजप मुसलमानांचा द्वेष करत नाही. ‘सर्वांचा साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्‍वास’ अशा घोषणेद्वारे भाजप काम करत आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे विधान करून मुसलमान नेते जाणीवपूर्वक देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !