शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची कार्यक्रम पत्रिका घोषित !

पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन ६ आणि ७ जानेवारी या दिवशी पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित केले आहे. हे शतक महोत्सवी नाट्यसंमेलन असल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण असेल.

२ दिवस चालणार्‍या या नाट्यसंमेलनात ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटके असा कार्यक्रम आहे. चिंचवड येथील केशवनगर भागातील श्री मोरया गोसावी संकुल येथे नाट्यसंमेलनाचा मुख्य सभामंडप असेल, तर भोईरनगर येथे बालनाट्य नगरी, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील ४ नाट्यगृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटके रसिक प्रेक्षकांना पहाता येतील, अशी माहिती मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजक तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.