सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना सभेचे निमंत्रण देतांना श्री. दत्तात्रय पिसे (उजवीकडे)

सोलापूर – येथील भवानी पेठ, जयभवानी प्रशालेचे मैदानावर ३ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भेटून निमंत्रण दिले. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’ या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री चिदंबर कारकल, पुरुषोत्तम कारकल, साईप्रसाद जोशी, तसेच अन्य धारकरी उपस्थित होते.