
अबुधाबी – संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये पहिले हिंदु मंदिर सिद्ध झाले आहे. मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी होणार आहे. या हिंदु मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा ऐतिहासिक क्षण असेल.
PM Modi accepts invitation to inaugurate the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, Delhi, India https://t.co/4OjdYUOm4u pic.twitter.com/ZluAL4xWDK
— BAPS (@BAPS) December 28, 2023
अबुधाबीतील ‘अल् वाक्बा’ नावाच्या ठिकाणी २० सहस्र चौरस मीटरच्या क्षेत्रात हे मंदिर बांधण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमध्ये अनुमाने २६ लाख भारतीय रहातात, जे तेथील लोकसंख्येच्या जवळजवळ ३० टक्के आहेत. संयुक्त अरब अमिराती सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी २० सहस्र चौरस मीटर भूमी दिली होती. वर्ष २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्यावर गेले होते तेव्हा संयुक्त अरब अमिराती सरकारने याची घोषणा केली होती. वर्ष २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दुबई दौर्याच्या वेळी तेथील ऑपेरा हाऊसमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने या मंदिराची पायाभरणी केली होती.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार