‘श्री अनघादत्तधाम कोल्हापूर’ या संस्थेचा भूमीपूजन समारंभ !

कोल्हापूर – समाजाची सर्वांगीण प्रगती आणि धार्मिक अधिष्ठानासमवेत, संस्कारक्षम विकासाकरता, धार्मिक उपक्रम ही काळाची आवश्यक असल्याने ‘श्रीअनघादत्तधाम’ या प्रकल्पास आमच्या सदैव सक्रीय शुभेच्छा आहेत. आज समाजापुढे असणारी आव्हाने आणि समस्या यांमधून समाजाला दिशा मिळण्याची आवश्यकता आहे. असा प्रकल्प उभा रहाणे, हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी केले. ‘श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम’ संचलित ‘श्री अनघादत्तधाम कोल्हापूर’ या संस्थेचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी ‘विश्वपंढरी’ या धार्मिक संस्थेचे पू. आनंदनाथ महाराज, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित, ‘श्रीविद्या शक्तिपात महायोग संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुहास जोशी, श्री. अभिजित रेणावीकर, ऐश्वर्या मुनीश्वर, श्री. सुनील जोशी, श्री. राजू मेवेकरी यांसह संस्थेचे सर्व विश्वस्त, जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर