
कोल्हापूर – ‘हे फाऊंडेशन’च्या वतीने श्री गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट गगनबावडा येथे जनकल्याणासाठी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. ९ जानेवारीपासून चालू होणार्या आणि ५ दिवस चालणार्या या यज्ञामध्ये ५१ कुंड शिवशक्ती महायज्ञासाठी ठेवण्यात येणार आहेत. जनकल्याणासाठी हा यज्ञ करण्यात येणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याची माहिती आयोजक डॉ. संगीता पाटील आणि व्यवस्थापक श्री. मंगेश लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. संगीता पाटील म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारचा यज्ञ आपल्याकडे पहिल्यांदाच होत आहे. ९ जानेवारीला या यज्ञाच्या धार्मिक विधींचा प्रारंभ करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, बिकानेरचे पंडित अशोक बिस्सा आणि पंडित अशोक रंगा, तसेच त्यांचे ८१ ब्राह्मण सहकारी उपस्थित रहाणार आहेत. ९ ते १३ जानेवारी या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत हा यज्ञ चालू रहाणार आहे.’’
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर