नवी देहलीच्या उड्डाणपुलांच्या कठड्यांवर आढळले कपाळमोक्ष करू शकणारे दगड !

लोकांना दगडांद्वारे लक्ष्य करण्याचे नवे षड्यंत्र असल्याचा संशय !

नवी देहली – येथील काही उड्डाणपुलांच्या संरक्षक कठड्यांवर थोड्या थोड्या अंतराने ५ किलोपर्यंत वजन असणारे दगड ठेवण्यात आले आहेत. या उड्डाणपुलांवरून वेगाने गाड्या जात असल्याने पुलामध्ये काही प्रमाणात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे कठड्यांवर ठेवलेले दगड पुलावरून खाली असलेल्या रस्त्यावर पडू शकतात. त्यामुळे खालून प्रवास करणार्‍या वाहनांवर किंवा पादचार्‍यांवर ते कोसळल्यास त्यांना गंभीर दुखापत किंवा मृत्यूही होऊ शकतो. या संदर्भातील एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ‘यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?’, याची चौकशी करण्याची मागणी देहली पोलिसांकडे केली जात आहे.

सामाजिक माध्यमांतून काही जणांनी हा व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन यांनी ट्वीट करत म्हटले आहे, ‘आतंकवादी आणि जाळपोळ करणार्‍यांनी देहलीतील लोकांना लक्ष्य करण्यासाठी नवीन षड्यंत्र रचले आहे. उड्डाणपुलांच्या कठड्यांवर एका कटाद्वारे दगड आणि विटा ठेवण्यात आल्या आहेत.’ जैन यांनी हे ट्वीट नवी देहली पोलिसांना टॅग (सूचित करणे) केले आहे.

संपादकीय भूमिका

सामान्य जनतेला जे दिसत आहे, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना कसे दिसत नाही ? कि ते आंधळे आहेत ?