तमिळनाडूमध्ये मिचाँग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस

  • चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती

  • विमानतळावरील विमान वाहतूक बंद

चेन्नई (तमिळनाडू) – बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने  ‘मिचाँग’ (शक्ती किंवा लवचिकता) नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने चेन्नई शहराला झोडपून काढले. येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच चेन्नई शहराच्या शेजारील चेंगलपेट, कांचीपुरम् आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी भरले. तसेच चेन्नई विमानतळात पाणी भरल्याने येथील विमान वाहतूक बंद करण्यात आली. पालिकाने शहरात ३५ से ८० किमी प्रतिघंटा वेगाने वारे वहात असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडल्याचा सल्ला दिला आहे. वादळाच्या शक्यताने येथील शाळांना आधीच सुटी देण्यात आली आहे.

मिचाँग चक्रीवादळ उद्या म्हणजे ५ डिसेंबर या दिवशी आंध्रप्रदेश राज्याला धडकणार आहे. राज्यातील नेल्लोर आणि मछलीपट्टनम् या जिल्ह्यांत ते येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाच्या २१ तुकड्या तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथे तैनात करण्यात आल्या आहेत. वादळामुळे मध्य रेल्वेने ३ ते ७ डिसेंबर या काळात धावणार्‍या १४४ गाड्या रहित केल्या आहेत.