भाईंदर येथील पाणीपुरीच्या पुर्‍या बनवणार्‍या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धाड !

ठाणे, २ डिसेंबर (वार्ता.) – भाईंदर येथील आझादनगरमध्ये असलेल्या एका कारखान्यात अस्वच्छ वातावरणात चक्क भूमीवर पाणीपुरीसाठी लागणार्‍या पुर्‍या लाटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने या कारखान्यावर धाड घातली आहे. सध्या कारखान्यातील साहित्याची पहाणी केली जात असून अन्वेषण करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांनी त्यांच्या भ्रमणभाषसंचामध्ये हे चित्रीत केले केले आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)