
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील ‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील अतीदक्षता विभागाच्या उद्घाटनास पालकमंत्री हसन मुश्रीफ हे २७ नोव्हेंबरला येणार होते. यापूर्वी इचलकरंजीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सुळकूड पाणी योजनेस हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. त्यामुळे ‘सुळकूड पाणी योजना कृती समिती’ने पालकमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यास काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचे घोषित केले होते. यामुळे रुग्णालय प्रशासनाने कार्यक्रम रहित केला. कृती समितीने २७ नोव्हेंबरला नागरिकांना अण्णारामगोंडा शाळेजवळील भाजी मार्केट मैदानावर जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे इचलकरंजीतील वाढता रोष पहाता रुग्णालय प्रशासनास कार्यक्रम रहित करावा लागला आणि त्यांनी तसे पत्र पोलीस प्रशासनास दिले.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !