लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !
पुणे – अन्न आणि औषध प्रशासनाने जिल्ह्यात ३ दिवसांत ९ ठिकाणी धाडी टाकून ८ लाख ५७ सहस्र ३५५ रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा शासनाधीन केला, तसेच या पदार्थांची साठवणूक करणार्या आस्थापनाला टाळे ठोकले, तर वाहतूक करणारे एक वाहनही शासनाधीन केले अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
नागरिकांचे हित आणि जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशान्वये गुटखा, तंबाखू, सुपारी या पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण आणि विक्री यांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे याच्या विक्री संदर्भातील माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही अन्न विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.