महंमद लारेब हाशमी याने प्रयागराज येथे हरिकेश विश्वकर्मा नावाच्या बसवाहकावर चाकूने आक्रमण केले. त्यामुळे विश्वकर्मा या बसवाहकाची अवस्था नाजूक आहे. हाशमी हा स्वत: ‘बी.टेक.’चा विद्यार्थी आहे. त्याने बसवाहकावर वार करून भडक विधाने करत स्वत:चा व्हिडिओ सिद्ध केला. पोलिसांच्या माहितीनुसार बसवाहक आणि हाशमी यांच्यामध्ये तिकिटाचे भाडे देण्यावरून वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने चॉपर शस्त्राद्वारे बसवाहकाच्या मानेवर आणि उर्वरित शरिरावर वार केले. परिणामी बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि हाशमी तेथून पळून गेला. एवढा मोठा चॉपर धर्मांधाने महाविद्यालयात कुठून आणला ? हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे हाशमी याने महाविद्यालयाच्या परिसरातच फिरून आणि हत्यार दाखवून दहशत माजवत स्वत:चा व्हिडिओ सिद्ध केला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये ‘पैगंबरांचा अवमान केला, इस्लामचा अवमान केला म्हणून मी आक्रमण केले’, असा इतर धर्मांध मुसलमान जसा खोटा दावा करतात अगदी तसाच दावा केला आहे. ‘अल्लाचा अवमान करणार्यांना मी सोडणार नाही, मुसलमानांनीही अशांना सोडू नये’, असे आवाहन करतांना तो दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानी मौलाना खादीम हुसेन रिझवी याची स्तुती करतांना दिसत आहे. रिझवी हा पाकमधील तेहरिक-ए-लब्बैक या आतंकवादी संघटनेचा संस्थापक आहे. या संघटनेने नुकतीच पाकमध्ये हिंसक निदर्शने करून हिंदु आणि ख्रिस्ती यांच्याविरुद्ध हिंसा करण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते.
धर्मांधांकडून समर्थन
या भयावह आक्रमणाविषयी सामाजिक माध्यमांमध्ये कार्यरत धर्मांध मुसलमानांनी निषेध करणे तर दूरच उलट सांगितले आहे की, या स्वत:च्या धर्मबांधवाच्या हिंसक कृत्याचा प्रसार बरेलवी, देवबंदी, शिया, सुन्नी अशा मुसलमानांमधील सगळ्या समुदायांमध्येच करा. म्हणजे त्यांचा या हिंसक कृतीला पाठिंबा आहे आणि ते त्याचे समर्थनच करतात. आफताब पुनावाला या धर्मांध मुसलमानाने श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्यावर त्याविषयीही धर्मांध मुसलमानांकडून आफताबचे समर्थनच करण्यात आले होते. विकृत धर्मांधाच्या या कृत्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हाशमीला कोण भारतीय विद्यार्थी समजेल ? एवढी कट्टर मानसिकता, धर्मांधता, दुसर्याला संपवण्याची वृत्ती, कृत्याचे उघडपणे समर्थन करणे, हे केवळ विशिष्ट विचारसरणी अंगीकारल्यामुळेच होते. अशीच धर्मांधता काही वर्षांपूर्वी राजस्थान येथे कन्हैयालाल या शिवणकाम करणार्या व्यक्तीच्या संदर्भात घडल्याचे आठवेल. खोटा दावा करत दोन कट्टर धर्मांध मुसलमानांनी धारदार हत्यारांनी कन्हैयालाल यांची ‘सर तन से जुदा….’ म्हणत हत्या केली होती. या हत्येनंतर त्यांनी स्वत:कडील शस्त्रे दाखवत आत्मप्रौढी करत हत्या केल्याचे सांगितले. या घटनेची दहशत अद्याप अल्प झालेली नाही. राजस्थान येथे काँग्रेसचे सरकार असल्याने कन्हैयालालची हत्या करणार्या आरोपींना शिक्षा होण्याची जराही शक्यता नाही. ‘या आरोपींना शिक्षा होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’, असा ‘पण’ त्यांच्या मुलाने केला आहे.
जिहाद्यांची मानसिकता एकच !
केवळ उत्तरप्रदेश, राजस्थान असे नाही, तर अन्य ठिकाणच्या जिहाद्यांची मानसिकता एकच असल्याचे आढळून येते आणि काफिरांची (अल्लाहला न मानणारे) हत्या, मूर्तीपूजकांची हत्या, त्यांना नष्ट करणे, इस्लामचे राज्य प्रस्थापित करणे, हेच त्यांच्या बोलण्याचे सार असते. उत्तरप्रदेश येथील अन्य एका व्हिडिओमध्ये समीर नावाचा धर्मांध मुसलमान युवक आणि काही धर्मांध मुले एका व्हिडिओमध्ये सांगतात, ‘‘आमची संख्या सध्या अल्प आहे. एकदा का आमची संख्या वाढली की, आम्ही योगी आणि मोदी या दोघांना सोडणार नाही.’’ त्यांना याचे कारण विचारले, तर उत्तर एकच असते, ते म्हणजे ‘मुसलमानांवरील अन्याय आणि अत्याचार !’ ‘मोदी काय अन्याय करतात ?’ या प्रश्नाला मात्र त्यांच्याकडे उत्तर नसते. त्यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. ही मानसिकता मुसलमान समाजातील लहान मुले, तरुण, आबालवृद्ध यांची आहे, तशी ती त्यांच्या स्त्रियांचीही आहे. एका धर्मांध स्त्रीच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये ती ‘मोदी यांच्यामुळे आम्हाला बुरख्यातून, तीन तलाकमधून सुटका मिळाली. गॅस, शेगडी सर्व मिळाले आहे; मात्र तरीही मोदी आणि योगी यांना मी मत देणार नाही’, असे सांगतांना दिसत आहे. काय म्हणावे या धर्मांधतेला ? वारंवार हिंदू, हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा यांविरुद्ध मदरसे, मशिदी यांतून जे विखारी आणि अत्यंत द्वेषपूर्ण कट्टरतेचे विष भिनवले जात आहे, त्याचाच हा परिणाम आहे.
धर्मांधांविषयी सर्वसामान्य भारतीय जनतेच्याच नव्हे, तर सर्वच जगातील सुसंस्कृत, सभ्य समाजात भय आणि असुरक्षितता यांचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी आयर्लंड येथे धर्मांध स्थलांतरिताने २ आयरिश मुले आणि ३ नागरिक यांच्यावर चाकूने आक्रमण केल्यावर आयरिश लोकांनी धर्मांधांविरुद्ध हिंसक आंदोलन केले. त्यांनी स्थलांतरित धर्मांधांच्या साहित्याची हानी केली आणि आग लावली. ‘स्थलांतरित धर्मांध देशात नकोच’, अशी त्यांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ जेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते; मात्र भाजपचे खासदार होते, तेव्हा एका सभेत भाषण करतांना त्यांनी सांगितले होते की, धर्मांधांविषयी आम्हाला जनजागृती करण्याची काहीच आवश्यकता नाही. ते स्वत:च एवढ्या क्रूर कृत्यांमध्ये सहभागी आहेत की, ते स्वत:ची अपकीर्ती स्वत:च करत आहेत. लोक स्वत:हून त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे करतील. अगदी तसेच घडत आहे. काही ठिकाणी लोक स्वत:हून धर्मांधांवर विशेष गाजावाजा न करता बहिष्कार घालण्याचे शस्त्र उगारत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी यांनी धर्मांधांविरुद्ध घरांवर बुलडोझर फिरवण्यासारखी जी कठोर भूमिका घेतली आहे, तशीची भूमिका सर्वच राज्यांत घेऊन धर्मांधांना वठणीवर आणणे आवश्यक आहे.
धर्मांध मुसलमानांच्या हिंसक कारवायांविरुद्ध कठोर मोहीम राबवून त्यांना वठणीवर आणणे आवश्यक ! |