|
नवी देहली – येथील जनता मजदूर कॉलनीत २१ नोव्हेंबरच्या रात्री एका १६ वर्षीय मुलाने १८ वर्षीय तरुणाची हत्या केली. आरोपीने आधी तरुणाचा गळा दाबला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूचे ६० वार करून त्याची निर्घृण हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर तरुणाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहावर तो नाचू लागला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली.
उत्तर देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास चालू आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीने मृतदेहाच्या डोक्यावर अनेक वेळा लाथा मारल्या. त्यानंतर तो मृतदेहावर नाचू लागला. त्यानंतर त्याला ओढत निर्जनस्थळी नेले. दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.
संपादकीय भूमिकाराजधानी देहलीतील कायदा-सुव्यवस्थेची जर ही स्थिती असेल, तर भारतातील अन्य भागांतील स्थितीचा विचारच न केलेला बरा ! |

महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !