पॅलेस्टाईन प्रशासनाला गाझामध्ये आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही ! – पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महंमद अब्बास व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – मी हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही हमासला नष्ट केल्यानंतर गाझात जे प्रशासन चालवत आहेत, त्यांना आम्ही आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्वीट करून दिली. पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.

नेतान्याहू पुढे म्हणाले की, सध्या पॅलेस्टाईनचे स्थानिक प्रशासन आतंकवादी कृत्य होत असल्याला नकार देते, आतंकवाद्यांना पाठिंबा देते, आतंकवाद्यांच्या मुलांना आतंकवादासाठी आणि इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशिक्षित करते. आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात हे होऊ देणार नाही. पॅलेस्टाईनचे परराष्ट्र खाते धक्कादायक दावे करत आहे. यात ते इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा करत आहेत. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महंमद अब्बास यांनीही इस्रायलवरील आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केला आहे. युद्धाला ४४ दिवस दिवस झाले, तरीही पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महंमद अब्बास इस्रायलवरील आक्रमणाचा निषेध करण्यास नकार देत आहेत.