बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भगव्या रंगावरून भाजपवर नाव न घेता टीका !

कोलकाता (बंगाल) – आता सर्व काही भगवे होत आहे. आम्हाला आमच्या भारतीय क्रिकेट खेळाडूंचा अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की, ते विश्वविजेते होतील; पण जेव्हा ते सराव करतात, तेव्हा त्यांचा पोषाखही भगवा झाला आहे. पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. आता मेट्रो स्थानकालाही भगवा रंग दिला जात आहे, अशा शब्दांत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जगधात्री पूजेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलतांना भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.
ममता बॅनर्जी भाजपचे नाव न घेता पुढे म्हणाल्या की, पुतळे उभारण्यास माझा आक्षेप नाही; पण ते सर्व काही भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता येते आणि जाते. हा देश जनतेचा आहे, केवळ एका पक्षाचा नाही.
ममता बॅनर्जी यांच्या टीकेवर भाजपने प्रत्युत्तर देतांना म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण कोलकाता निळ्या आणि पांढर्या रंगात रंगवला आहे.
संपादकीय भूमिका
|
सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !