उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीहरि खेमका आणि कु. दुर्वा नित्यानंद भिसे हे दोघे या पिढीतील आहेत !
कतरास (झारखंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. श्रीहरि खेमका याचा आज कार्तिक शुक्ल पंचमी (१८.११.२०२३) या दिवशी ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने खेमका कुटुंबियांनी कु. श्रीहरीची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. श्रीहरि खेमका याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२३ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
११.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी कतरास (झारखंड) येथील सनातनचे संत पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे समष्टी संत) यांचा नातू कु. श्रीहरि (वय ६ वर्षे) आणि खेमका कुटुंबीय यांच्याशी वार्तालाप झाला. त्या वेळी पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या समष्टी संत) आणि पू. गीतादेवी खेमका (सनातनच्या ८३ व्या व्यष्टी संत) यांनी कु. श्रीहरीची सांगितलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. श्रीहरि खेमका याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. नाडीवाचनात श्रीहरीचा उल्लेख येऊन तो हिंदु राष्ट्राचे कार्य करणार असल्याचे समजणे
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : नमस्कार ! आम्हाला श्रीहरिविषयी सांगा. तो काय काय साधना करतो.
पू. प्रदीप खेमका (श्रीहरीचे आजोबा) : श्रीहरीचा जन्म होण्यापूर्वी आम्ही काही नाडीवाचन करणार्यांकडे गेलो होतो, तर त्यात उल्लेख असा यायचा की, तुमच्या घरी एक मुलगा होईल आणि त्याचे नाव ‘श्रीहरि’ असेल. तो हिंदु राष्ट्राचे कार्य करील. हे आमचे (महर्षींचे) नियोजन आहे की, त्याने हिंदु राष्ट्रात नेतृत्व करून साहाय्य करावे.’ त्या वेळी आम्हाला अत्यंत कृतज्ञता वाटत होती.
बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण त्याला बाळघुटी पाजतो ना ! त्या वेळी मी ‘श्रीहरि’ असे त्याचे नाव घेऊन त्याला म्हटले, ‘श्रीहरि, तोंड उघड.’ त्याने त्याचे तोंड उघडून जीभही बाहेर काढली. तेव्हा आम्ही ‘ॐ’चे लॉकेट मधात बुडवून त्याच्या जिभेवर ठेवले. त्या वेळी त्याने स्मितहास्य केले. तेव्हा मी त्याच्या कानात हेच सांगितले, ‘तुझा जन्म ईश्वरी नियोजनानुसार ‘ईश्वरी राज्यासाठी झाला आहे, तर तू आपली साधना आणि आपले सर्वस्व गुरुदेवांना समर्पित कर.’ तेव्हा तो जोरजोराने हसू लागला. ते पाहून तो ‘आजोबा, मी हेच करण्यासाठी आलो आहे !’, असे म्हणत असल्याचे मला जाणवले. मी जे काही बोलत होतो, तेे बाळाला सर्व समजत होते. त्यामुळे त्याच्या चेहर्यावर हास्य पसरले.
पू. (सौ.) सुनीता खेमका (श्रीहरीची आजी) : ताई हा जेव्हा २ – ३ मासांचा होता, तेव्हा पू. खेमका खोलीत जात असतांनाच ‘श्रीहरि नमस्कार, श्रीहरि नमस्कार’, असा नमस्कार करायचे. जेव्हा त्याने स्वतःचा हात हालवणे चालू केले, तेव्हा
पू. खेमका यांनी नमस्कार म्हटल्यावर हा हळूहळू आपल्या हातांची नमस्काराची मुद्रा करत होता. ३ मासांतच त्याच्यावर हा संस्कार होऊन तो नमस्कार करू लागला. सर्वांत पहिले त्याचे हे लक्षण दिसून आले.
२. कठीण प्रसंगात कुणीही न शिकवता ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करणे
कु. तेजल : ही दैवी बालके असतात, तर त्यांचे बोलणे किंवा कोणत्याही प्रसंगाकडे पहाण्याचा आणि विचार करण्याचा वेगळा दृष्टीकोन असतो, तर अशी काही उदाहरणे आहेत का ?
पू. (सौ.) खेमका : हा ‘श्री विष्णवे नमः ।’ हाच नामजप करतो. त्याला आम्ही कुणीही शिकवले नाही. काल आम्ही नागेशीला गेलो होतो. नागेशीहून निघतांना गाडीत बसतांना माझ्या डोक्याला मार लागून जखम होऊन रक्त वाहू लागले. त्या वेळी त्वरित तो ‘श्री विष्णवे नमः । श्री विष्णवे नमः ।’, असे म्हणू लागला. आम्ही रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येईपर्यंत आणि माझ्या डोक्यातून रक्त वहाणे थांबेपर्यंत तो ‘श्री विष्णवे नमः ।’ असा नामजप करत होता.
कु. तेजल : या प्रसंगात असे लक्षात येते, ‘कोणतीच व्यक्ती आपल्याला साहाय्य करू शकत नाही, तर केवळ ईश्वरच येऊन आपल्याला साहाय्य करू शकतो’, अशी या दैवी बालकांची श्रद्धा असते. त्यामुळे त्याने त्वरित ईश्वराचा नामजप चालू केला.’
३. चुकांप्रती संवेदनशील असणे
पू. (सौ.) खेमका : त्याला चूक झाल्यावर सारणीत लिहायची सवय आहे. तो ३ वर्षांचा असतांना शाळेत जाऊ लागला होता. आम्ही सारणीलिखाण करतांना तोसुद्धा आमच्या समवेत यायचा आणि म्हणायचा, ‘‘मलाही सारणी लिहायची आहे.’’ तो मला स्वतःच्या चुका विचारून त्यातील एक-दोन चुका लिहायला सांगायचा.
कु. तेजल : चूक त्याच्या लक्षात यायची का ?
पू. (सौ.) खेमका : हो. चूक त्याच्या लक्षात येते. नंतर तो मला विचारायचा माझ्याकडून आणखी कोणत्या चुका झाल्या आहेत ? तसे चुकांकडेही त्याचे लक्ष असते.
पू. (सौ.) खेमका : ‘प.पू. भक्तराज महाराज दैनंदिनी (डायरी) लिहायला झोपाळ्यावर बसले आहेत’, असे त्यांचेे छायाचित्र आहे. त्यांच्या हातात वही आणि पेन आहे. ते पाहून त्याचा असा संस्कार झाला आहे की, बाबा त्या वहीत सगळ्यांच्या चुका लिहित असतात. ज्या दिवशी माझ्याकडून (पू. (सौ.) खेमका यांच्याकडून) चूक होते, तेव्हा मी त्याला सांगते, ‘श्रीहरि, माझ्याकडून आज चूक झाली आहे. बाबा माझी चूक लिहीत आहेत.’ तेव्हा तो मला म्हणतो, ‘‘हो आजी, बाबा तुझी चूक लिहीत आहेत.’’
४. चुकांविषयी सतर्क राहून कृती करणे आणि प्रायश्चित्त घेणे
कु. तेजल : नमस्कार, श्रीहरि ! आता तू आम्हाला काय काय साधना करतोस, ते सांग.
श्रीहरि : जेव्हा श्रीहरि भोजन करायला बसेल, तेव्हा तो प्रार्थना करूनच भोजन आरंभ करतो आणि चुकीसाठी प्रायश्चित्त घेतो.
कु. तेजल : प्रायश्चित्त घेतल्यामुळे काय होते ?
श्रीहरि : चुकीचे चांगले होते (पापक्षालन होते).
कु. तेजल : त्याला जे प्रायश्चित्त सांगितले, ते तो घेतो का ?
पू. (सौ.) खेमका : हो. तो घेतो. एकदा त्याच्याकडून एक छोटी चूक झाली. तेव्हा मी त्याला म्हटले की, आज प्रायश्चित्त म्हणून तू चॉकलेट खायचे नाहीस. (त्याला चॉकलेट पुष्कळ आवडतात.) तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला हे चॉकलेटचे प्रायश्चित्त घेता येणार नाही.’’ त्यानंतर एकदा त्याच्याकडून मोठी चूक झाली. त्या वेळी त्याने स्वतःहून प्रायश्चित्त घेतले की, आज मी चॉकलेट खाणार नाही. प.पू. म्हणतात ना ‘मोठी चूक झाली असेल, तर मोठे प्रायश्चित्त घ्यायचे’, तसे त्याने घेतले. त्याने त्या दिवशी खरोखर अजिबात चॉकलेट मागितले नाही. (क्रमशः)