
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले.
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी करायला सांगितलेले वेगवेगळे प्रयोग येथे पाहूया.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी करायला सांगितलेले उपाय
‘प.पू. डॉक्टरांनी कोणते उपाय प्रभावी आहेत’, ते करून बघायला सांगितले. ते उपाय पुढे दिले आहेत.
अ. हाताची ४ बोटे तोंडासमोर धरून नामजपादी उपाय करणे
आ. हाताची पाचही बोटे एकमेकांना न जुळवता उपाय करणे
१ अ. उपाय केल्यावर जाणवलेले सूत्र : हाताची पाचही बोटे एकमेकांना न जुळवता उपाय केल्यावर पू. दातेआजींच्या पायाची हालचाल अधिक जाणवली.
१ आ. निष्कर्ष : हाताची पाचही बोटे एकमेकांना न जुळवता उपाय करणे अधिक प्रभावी आहे.

प्रयोग क्र. १
‘२१’ या अंकाचा नामजप करत उपाय करणे
श्री. निरंजन दाते : ‘२१’ या अंकाचा नामजप करत असतांना माझा आपोआप ‘निर्गुण’ असा जप चालू झाला. प्रयत्न करूनही तोच जप चालू रहात होता.
अ. प्रयोग केल्यावर जाणवलेले सूत्र : ‘२१’ अंकाच्या जपाच्या तुलनेत निर्गुण जप केल्याने पू. दातेआजींचे हात आणि पाय अधिक हलत होते.’
प्रयोग क्र. २
‘पू. दातेआजींच्या पोटावर श्रीकृष्णाच्या प्रतिमेची सगुण बाजू ठेवल्यानंतर काय जाणवले ?’, याचा अभ्यास करणे
२ अ. प्रयोग केल्यावर जाणवलेले सूत्र : श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवून वेगळा काही पालट जाणवला नाही.
प्रयोग क्र. ३
३ अ. पू. आजींच्या पावलांकडे बघत उपायांसाठी आलेला जप करणे आणि तेव्हा काय जाणवते, ते पहाणे
३ आ. प्रयोग केल्यावर जाणवलेली सूत्रे
श्री. नरेंद्र दाते आणि सौ ज्योती दाते : ‘दोघांनी पू. आजींच्या पावलांकडे बघत उपायांसाठी आलेला जप केल्यावर पू. आजींच्या पायांची बोटे थोडी हलली. एकाच वेळी दोघांपैकी एकाने पावलांकडे पहात जप करणे आणि दुसर्याने न्यास मुद्रा करत जप करणे, असे केल्यावर पू. आजींचे पाय गुडघ्यापर्यंत हलले, डावा हात हलला आणि डोळेही उघडले.
सौ. नेहा दाते : पू. आजींच्या पावलांकडे बघत उपायांसाठी आलेला जप केल्यावर पू. आजींच्या पायाची बोटे थोडी हलली.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२४)