निकषाबाहेर जाऊन आपत्तीग्रस्‍तांना साहाय्‍य ! – शासन निर्णय

 मुंबई – जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्‍यांना राज्‍यशासनाकडून निकषाच्‍या बाहेर जाऊन आर्थिक साहाय्‍य करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये कोरडवाहू क्षेत्रातील शेतपीक, फळ यांच्‍या हानीसाठी प्रतिहेक्‍टर ८ सहस्र ५०० रुपये देणार आहेत. हे साहाय्‍य ३ हेक्‍टर भूमीपुरते आहे. राज्‍य आपत्ती प्रतिसाद निधीतून चक्रीवादळ, दुष्‍काळ, भूकंप, आग, पूर, त्‍सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, अवेळी पाऊस, अतीवृष्‍टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग यांसाठी ही आर्थिक साहाय्‍य देण्‍यात येणार आहे.