पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेशासह जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचा भंग करणार्यांवर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याची तक्रार पुढे आल्याने विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रीक प्रणालीच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कुणालाही सहज विद्यापीठ परिसरात प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे विद्यापिठात होणारे गोंधळ आणि अनुचित प्रकार अल्प होण्याची शक्यता आहे.