पुणे – हर घर सावरकर समिती आणि भारत इस्रायल मैत्री मंच यांच्या वतीने इस्रायलच्या समर्थनार्थ येथे ११ नोव्हेंबर या दिवशी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सारसबाग येथील वीर सावरकर स्मारक पासून चालू होऊन टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पर्यंत असणार आहे. ‘पुणे स्टॅन्ड्स विथ इस्रायल’ (पुण्याचे इस्रायलला समर्थन) असे या पदयात्रेचे नाव असून यातून इस्रायलला पुणेकरांकडून समर्थन देण्यात येणार आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ सर्व पुणेकर नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.