सातारा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष असलेले महाराष्ट्रातील गड हे सर्वच मावळ्यांचे श्रद्धास्थान आहेत. हाच भाव मनात ठेवून सज्जनगडच्या पायथ्याशी असणार्या परळी भागातील मावळ्यांकडून ‘एक मशाल शिवरायांच्या चरणी’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या संकल्पनेतून १२ नोव्हेंबर या दिवशी सज्जनगड येथे ‘मशाल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ३ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘दुर्गनाद प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात आली आहे.