तेहरान (इराण) – गाझावरील बाँबफेक त्वरित बंद झाली पाहिजे. मुसलमान देशांनी इस्रायलला इंधन आणि खाद्यपदार्थ यांची निर्यात करू नये, असे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी केले. त्यांनी पॅलेस्टाईनच्या सैन्याला पाश्चात्त्य देश ‘आतंकवादी’ ठरवत असल्यावरूनही टीका केली.