|

नवी देहली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर लेख लिहिला आहे. ‘द हिंदु’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या या लेखामध्ये त्यांनी हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला ‘अमानुष’ म्हटले आहे. ‘या आक्रमणात एक सहस्राहून अधिक लोक ठार झाले. हे आक्रमण इस्रायलसाठी विनाशकारी होते’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याखेरीज त्यांनी गाझावर इस्रायलकडून होणार्या आक्रमणाविषयीही प्रश्न उपस्थित करत ‘निष्पाप लोकांवर सूड उगवण्यात येत आहे’, अशी टीका केली आहे.
The world was diminished by the brutal attacks on #Israel; the world stands diminished again by Israel’s disproportionate and equally brutal response, writes @SoniaGandhi_FChttps://t.co/CxiDX8ecK0
— The Hindu Comment (@TheHinduComment) October 30, 2023
सोनिया गांधी यांनी लेखात म्हटले की, इस्रायल आता पूर्ण शक्तीनिशी आणि मोठ्या प्रमाणात असाहाय, तसेच निष्पाप लोकांविरुद्ध सूड उगवत आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली शस्त्रे ही मुले, महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध वापरली जात आहेत. ज्यांचा हमासच्या आक्रमणाशी काहीही संबंध नव्हता, ते मारले गेले आहेत. नागरिकांना रुग्णालये अपूर्ण पडत आहेत. पाणी, अन्न आणि वीज नाकारणे हे पॅलेस्टिनी लोकांसाठी सामूहिक शिक्षेपेक्षा अल्प नाही. इस्रायल सरकार हमासच्या कृतींची पॅलेस्टिनी लोकांच्या कृतींशी तुलना करून मोठी चूक करत आहे. हमासचा नाश करण्याच्या निर्धाराने इस्रायलने गाझामधील सामान्य लोकांचा विनाश केला आहे.
संपादकीय भूमिका
|
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister