पतीकडून पत्नीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न ! आणि अन्य घडामोडी
नात्याला काळीमा फासणारी घटना !
डोंबिवली – घरात स्वच्छता चालू असतांना पत्नीने पतीला स्टूल उचलून बाजूला ठेवण्यास सांगितले. याचा राग आल्याने पतीने पत्नीला पंख्याला दोरी लटकवत गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने यातून स्वतःची सुटका केली. तिच्या गळ्यावर ओरखडा दिसल्याने नातेवाईकांनी याविषयी विचारणा केल्यावर वरील प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
रेल्वे सुरक्षारक्षक महिलेवर आक्रमण !
सर्वच ठिकाणी महिला असुरक्षित !
डोंबिवली – कसारा लोकलमध्ये गस्त घालणार्या रेल्वे सुरक्षारक्षक महिला नीरजा यांच्यावर एका माथेफिरूने आक्रमण केले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेवर चाकूने आक्रमण करणार्याला अटक !
मुंबई – बाजारातून घरी जाणार्या महिलेची छेड काढून तिच्यावर चाकूने आक्रमण करणार्या बाबू बंगाली (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. चाकूमुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
८ वर्षीय मुलीसमवेत शेजार्याचे अश्लील कृत्य !
वाढती वासनांधता धोकादायक !
मुंबई – चॉकलेटचे आमीष दाखवून ८ वर्षीय मुलीसमवेत शेजार्याने अश्लील कृत्य केले. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शेजार्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीचे आई-वडील शेतीच्या कामासाठी घराबाहेर गेले होते.