न्यूयॉर्क – इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे. इस्रायल-हमास युद्धाचे रूपांतर भविष्यात अमेरिका आणि इराण यांच्यात थेट संघर्षात होऊ शकते, अशी भीती इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांनी नुकतीच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र्र महासभेच्या विशेष सत्रात व्यक्त केली. हमासचे इस्रायलवर आक्रमण, म्हणजे स्वातंत्र्यलढा आहे, असेही अब्दुल्लाहियान यांनी सांगितले.