‘सर्वधर्मसमभावा’चे दिवा स्वप्न पहाणारा समाज यातून काही बोध घेणार का ?

एका न्यायालयात एका जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी पीडित व्यक्ती सर्वधर्मसमभावाचे दिवा स्वप्न पहाणारी होती. त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण झाली होती आणि त्याच्या तक्रारीत शस्त्राने मारल्याचा उल्लेख होता; परंतु यात आरोपी धर्मांध आणि ज्यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी चालू होती, ते न्यायाधीश त्या आरोपीच्याच पंथाचे होते. या न्यायाधिशांनी स्वत:चे धर्मप्रेम दर्शवत त्यांनी आदेश पारित केला आणि सरळ सरळ आरोपीच्या बाजूने निकाल दिला. याच समवेत या प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांना ‘भारतीय दंड विधानातील अल्प तीव्रतेचे कलम लावायला हवे’, असे त्या न्यायाधिशांनी बोलून दाखवले. खरेतर पोलिसांनी अन्वेषण करतांना योग्य कलम लावले असतांनाही त्यांनी त्यावर शंका उपस्थित केली.

दुसर्‍या एका प्रसंगात अधिवक्ता आणि न्यायाधीश हे दोघेही एकाच पंथाचे होते. त्या वेळी ‘सर्वधर्मसमभावाचे दिवा स्वप्न पहाणार्‍या’ या अधिवक्त्यांकडून त्या त्या पंथाच्या सोयीचा विशेष विचार केला.

‘कट्टरतावाद हा केवळ राजकारणातच आहे’, असे नाही, तर तो आता न्यायपालिकेतही संचार करू लागल्याचे चिन्ह दिसत आहे; परंतु हे सर्व ‘सर्वधर्मसमभावा’च्या नावाखाली शांतपणे पहात रहायचे.

– एक धर्मप्रेमी अधिवक्ता (ऑक्टोबर २०२३)