
रत्नागिरी – जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी कट करून लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणातील आरोपी सुमीत संजय लोथ याला संगमेश्वर पोलिसांनी तत्परतेने अटक केली होती; मात्र दुसरा आरोपी पसार झाला होता. जानेवारी २०२३ मध्ये हा गुन्हा घडल्यापासून पसार असलेला प्रेम शिंदे (संगमेश्वर) या आरोपीला ९ मासांनंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील उंबार्ली गावात अटक केली. या लैंगिक अत्याचार प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
संगमेश्वर तालुक्यात लैंगिक अत्याचार करून पळालेला आरोपी उंबार्ली गावातील एका चाळीत रहात असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार सचीन वानखेडे यांना मिळाली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी सापळा लावून पकडून त्याला संगमेश्वर पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण संगमेश्वर पोलीस करत आहेत.
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
आषाढी वारीमध्ये वारकर्यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे
१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग