चामुंडा यागाच्या वेळी कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२१ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चामुंडा याग करण्यात आला. या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ‘पुरोहित साधक मंत्र म्हणत होते. त्या वेळी मला मंत्रांमध्ये शक्ती जाणवत होती आणि ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तींचे आवरण निघून जात आहे’, असे जाणवत होते. नंतर मला हलकेपणा जाणवला.

२. यज्ञकुंडातील अग्नीमध्ये पुष्कळ शक्ती जाणवत होती. अग्नीतील तेज वाढले होते. मी देवीला प्रार्थना करायचे, तेव्हा नमस्काराची मुद्रा केलेल्या माझ्या हातांच्या तळव्यांना उष्णता जाणवत होती.

कु. प्रतीक्षा हडकर

३. पूर्णाहुतीच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. यज्ञात आहुती देत असतांना यजमानांच्या चेहर्‍यावर तेज जाणवत होते.

आ. पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञाच्या ठिकाणी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामध्ये देवीतत्त्व वाढले असल्याचे जाणवले. तेव्हा ‘प्रत्यक्षात देवीच भूमीवर अवतरली आहे’, असे मला जाणवले.

इ. पूर्णाहुतीच्या वेळी पुरोहित साधक मंत्र म्हणत असतांना त्या मंत्रांतून भगवतीदेवीची मारक शक्ती प्रक्षेपित होत होती.

ई. ‘माझ्या विशुद्धचक्रापासून ते अनाहतचक्रापर्यंत एक प्रकारचा थंडावा खाली खाली उतरत आहे’, असे मला जाणवले. मला तो थंडावा हवाहवासा वाटला.

४. आरती चालू असतांना अंगावर रोमांच येऊन मनाला उत्साह जाणवत होता.’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक