रत्नागिरी येथील श्री. प्रकाश दीक्षित यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि त्यांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या भावमय सत्संगात आलेली अनुभूती 

श्री. प्रकाश दीक्षित

‘ एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग लाभला. सत्संगामध्ये सर्व साधक आपापले अनुभव आणि अनुभूती सांगत होते. ‘साधकांचे बोलणे ऐकतांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या दरबारात हा सत्संग चालू आहे’, असे मला वाटले. सर्वांचे अनुभव ऐकतांना माझे मन आनंदाने भरून गेले. ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच सर्वांना मार्गदर्शन करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा गुरुदेवांच्या साधकांवरील प्रीतीची अनुभूती मला येत होती. मी पूर्णपणे भावावस्थेत होतो. मला संपूर्ण जगाचा विसर पडला होता.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता

अ. ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, प्रत्यक्ष आपणच आमच्या जीवनात आनंद आणला आहे आणि आमच्या जीवनाचे कल्याण केले आहे. सौ. मंजिरी आणि श्री. विनायक आगवेकर यांना आनंदात पाहून आणि आमचे झालेले कल्याण अनुभवून मन कृतज्ञतेने भरून येते.

श्री. विनायक आगवेकर

(सौ. मंजिरी विनायक आगवेकर [श्री. प्रकाश दीक्षित यांची कन्या], आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे आणि श्री. विनायक आगवेकर [श्री. प्रकाश दीक्षित यांचे जावई], आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे)

आ. ज्या वेळी आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्नरत राहून प्रसंगातून शिकण्याचा आनंद घेतो, त्या वेळी आपल्या कृपेची आठवण झाल्याविना रहात नाही आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘आपण आमच्या जीवनात आलात’, याचे मोल अंतःकरणात कोरून ठेवल्याप्रमाणे झाले आहे.

सौ. मंजिरी आगवेकर

इ. सौ. मंजिरीला तिचे सासू-सासरे, दीर, जाऊ असे आध्यात्मिक कुटुंब लाभले. सौ. मंजिरीचे सासू-सासरे (सौ. सुशिला रमेश आगवेकर, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७८ वर्षे आणि श्री. रमेश आगवेकर, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८२ वर्षे) यांचा आध्यात्मिक स्तर चांगला असून चुलत सासरे हे सनातनचे संत (सनातनचे ७९ वे व्यष्टी संत पू. श्रीकृष्ण आगवेकर, वय ८७ वर्षे) आहेत. हे सर्व आपल्याच कृपेमुळे घडले, याची आम्हाला प्रचीतीच येत आहे.

हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळेच आमच्या कुटुंबाचा उद्धार झाला. आपल्या कृपेमुळेच आमच्याकडून साधना होत आहे. यापुढेही आपली कृपादृष्टी आम्हा सर्वांवर अखंड असावी आणि आमची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. प्रकाश बाळकृष्ण दीक्षित (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७४ वर्षे), रत्नागिरी. (५.१०.२०२४)