‘महर्षींच्या आज्ञेने फार्मागुडी (गोवा) येथे ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी जाण्यापूर्वी
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी साधकांनी गोवा येथे जाण्याचे ठरवले. त्या वेळी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून मी ‘येणार नाही’ असे सांगितले; पण नंतर सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितल्यावर माझे मन पालटले.
आ. मी ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी जाण्याचे ठरवल्यापासून माझा उत्साह इतका वाढला की, ‘मला काही त्रास आहेत आणि गोळ्या चालू आहेत’, याचे मला विस्मरण झाले. माझी देहबुद्धी न्यून झाली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी गोवा येथे जातांना
अ. गोवा येथे जातांना ‘मार्ग आणि मार्गातील झाडे आनंदाने डोलत असून बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना
अ. गोवा येथे पोचल्यावर मला वातावरणात प्रचंड चैतन्य जाणवत होते आणि ‘येथे काहीतरी भव्य-दिव्य घडत आहे’, असे मला जाणवत होते.
आ. उन्हाची वेळ असूनही उकाडा जाणवत नव्हता. वातावरण अत्यंत प्रसन्न होते.
इ. ‘सोहळ्याच्या ठिकाणी गुरुदेव प्रत्यक्ष येणे’, ही एक असामान्य अनुभूती आहे. ‘साधकांसाठी गुरुदेवांनी स्वतः रथातून फिरणे’, ही कृपा केवळ आणि केवळ ईश्वरच करू शकतो. ‘आम्ही साधना आणि भक्ती करण्यात अन् गुरुदेवांची कृपा संपादन करण्यात अल्प पडतो, तरीही गुरुदेव साधकांवर इतके प्रेम करत आहेत, इतकी कृपा करत आहेत’, याची मला जाणीव झाली. गुरुदेवांना रथात बसून फिरतांना पाहून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.
ई. ‘रथासमोर असलेल्या साधकांचा गोपीभाव आणि साधिकांची गोपीभक्ती पाहून मी स्वर्गलोकात आहे’, असे मला वाटत होते.
उ. ‘गुरुदेवांच्या रथयात्रेच्या वेळी आणि नंतर नृत्य अन् गायन सादर करण्यात आले. ‘नृत्य आणि गायन स्वर्गलोकात सादर होत आहे’, असे मला जाणवत होते. सद़्गुरु आणि संत यांची साधकांना ओळख करून देण्यात आली. संतांनी मार्गदर्शन केले. हे सर्व चालू असतांना ‘सूर्य प्रसन्न होऊन पहात आहे. देवता ईश्वरी राज्यातील हा सोहळा पहात आहेत’, असे मला जाणवत होते. सूर्य आकाशात असूनही वातावरणात गारवा जाणवत होता. अधूनमधून गार वार्याची झुळूक येत होती. ही एक मोठी अनुभूती आहे.
ऊ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासमोर पंचमहाभूते लीन आहेत’, असे मला वाटत होते.
ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे वर्णन करणे शब्दातीत आहे. ‘अनेक जन्मांचे पुण्य म्हणून मी आज साधनेत आहे आणि हा दैवी सोहळा अनुभवत आहे’, याची मला जाणीव झाली. मी सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणांवर संपूर्ण नतमस्तक झाले.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळ्याला जातांना, तसेच सोहळा पहातांना मला काहीही त्रास झाला नाही आणि पाहून झाल्यावरही काहीही त्रास झाला नाही. दिवसभराचा प्रवास करून आणि सोहळ्याच्या वेळी एका जागी ४ घंटे बसूनही मला काहीही त्रास झाला नाही.
आ. ‘गुरुदेव त्यांची शारीरिक क्षमता नसतांनाही केवळ आणि केवळ साधकांसाठी पुष्कळ वेळ रथात बसले होते. त्यांच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकल गाडगीळ साधकांना प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी, आपत्काळासाठी चैतन्य देण्यासाठी आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी पुष्कळ वेळ रथात बसल्या होत्या. सनातनच्या या तीनही गुरूंनी साधकांवर केलेली कृपा अपार आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार करून ‘त्यांनीच आमच्याकडून साधना करून घ्यावी. त्यांना अपेक्षित अशी आमची साधनेत प्रगती व्हावी’, अशी मी प्रार्थना करते.’
– डॉ. मृणालिनी भोसले, मिरज, सांगली. (२८.५.२०२३)