निदर्शने करणार्‍या हमास समर्थकांवर कठोर कारवाई करा ! – ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा आदेश  

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये हमासचे समर्थन करणार्‍यांवर कठोर कारवाई करा, असा आदेश ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी दिला.

गृहमंत्री ब्रेव्हरमन पुढे म्हणाले की, इस्रायलवरील आक्रमणानंतर ब्रिटनमध्ये हमासच्या समर्थकांकडून करण्यात येणारी ही निदर्शने एकप्रकारे ज्यू समुदायाला धमकावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे सगळ्या पोलीस प्रमुखांनी या निदर्शनांच्या विरोधात पोलिसी बळाचा पूर्ण वापर करावा. इंग्लंडच्या रस्त्यांवर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावणे योग्य नाही; कारण असे करणे, म्हणजे आतंकवादाला समर्थन दिल्यासारखे होईल.

पाकिस्तानात इस्रायलच्या उच्चायुक्तालयाबोहर पॅलेस्टाईन समर्थकांकडून निदर्शने

पाकिस्तानामध्ये पॅलेस्टाईनच्या सहस्रो समर्थकांनी १० ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलच्या उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. यातील ३ निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. निदर्शने करणार्‍यांमध्ये एकाचे वय केवळ १५ वर्षे आहे.

संपादकीय भूमिका 

ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?