९ वर्षांपूर्वी आदेश काढलेला असूनही त्याचे पालन न करणारे कर्तव्यचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी !
मुंबई – शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याविषयीचा आदेश ७ मे २०१४ या दिवशी राज्यशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे; मात्र अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत. त्यामुळे येथे येणार्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखता न आल्याने अडचण येते. त्यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी शासन आदेश काढून याविषयी कार्यवाही न करणार्यांवर कारवाईचा आदेश शासनाने दिला आहे. ओळखपत्र दर्शनी भागात न लावणार्या शासकीय कर्मचार्यांनी नावे सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडे देण्याची सूचना या आदेशात देण्यात आली आहे.