महंतांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध !
नवी देहली – डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखल्याची माहिती पुष्कल द्विवेदी यांनी ‘एक्स’वरून दिली. महंतांचा घोर अपमान केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अभी अभी यति जी महाराज को लखनऊ आने से रोकने के क्रम में उनको घोर अपमानित किया गया है। @myogiadityanath @myogioffice आपकी राजनीतिक मजबूरियां हमने समझीं, आप पर केंद्र ने जो शिकंजा कस रखा है वो भी हमने समझा। परंतु, एक तेजस्वी संत का इस तरह का घोर अपमान आपको गुरु परंपरा का भी द्रोही… pic.twitter.com/uzie4yZSUI
— Wing Commander Pushkal Dwivedi (@pushkal_dwivedi) October 10, 2023
यासंदर्भात महंतांचा एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध करून त्यांना आव्हान दिले आहे. महंत म्हणाले की, मला अटक करून दाखवा ! मी केवळ माझ्या मुलांच्या कल्याणासाठी लखनऊला जात होतो; परंतु तुमच्या पोलिसांनी माझा अपमान केला आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उत्तरप्रदेशातील लोक (धर्मांध मुसलमान) इस्रायलमध्ये मारल्या गेलेल्या महिलांच्या प्रेतांसमवेत फिरणार्यांचे समर्थन करत होते. त्यांच्यावर बुलडोझर फिरवून दाखवा. तुम्हाला महाराणा प्रताप बनण्याची संधी होती; पण तुम्ही ती गमावत आहात.