नमन कलावंतांचे उर्वरित प्रस्ताव शासनाने तातडीने संमत करावेत !

‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटने’च्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

रत्नागिरी – नमन कलावंतांचे १९२ प्रस्ताव संमत झाले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांतील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव उशिरा पोचल्यामुळे संमतीच्या प्रतीक्षेत आहेत. ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने संमत करण्यात यावेत, अशी मागणी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा संघटनेतील ज्येष्ठ सदस्य श्रीधर खापरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेने नमन आणि जाखडी या लोककलांना राज्यशासनाने मान्यता द्यावी, या कलेला राजाश्रय मिळावा’, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मान्य झाली आहे.