लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेकडूनही इस्रायलवर हवाई आक्रमण

इस्रायलकडून प्रत्‍युत्तरादाखल आक्रमण

तेल अविव (इस्रायल) – पॅलेस्‍टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने ७ ऑक्‍टोबर या दिवशी इस्रायलच्‍या ७ शहरांवर ५ सहस्र रॉकेट डागल्‍याच्‍या घटनेनंतर आता लेबनॉन या देशातील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर हवाई आक्रमणे केली आहेत.

हिजबुल्लाकडून इस्रायलवर मोर्टार (लहान तोफगोळे) डागण्‍यात आले. या आक्रमणाला इस्रायलकडून प्रत्‍युत्तर देण्‍यात आले आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्‍या ठिकाणावर हवाई आक्रमणे केली.