संभल (उत्तरप्रदेश) – देश कुणाच्या बापाचा नाही. राज्यघटनेने मुसलमानांना देशात रहाण्याचा अधिकार दिला आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना येथे रहाण्याचा अधिकार आहे; मात्र देशात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. भाजप सरकार देशातील मुसलमानांना शांततेत जगू देत नाही. मुसलमान देशाच्या विरोधात नाही, तेही देशाचे भले इच्छित आहेत. यामुळे त्यांना शांततेत जगू द्यावे, असे फुकाचे विधान येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केले. ते गुजरातमध्ये शिवणकाम करणार्या मुसलमानांवर कथित धार्मिक घोषणा न दिल्यावरून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून बोलत होते. खासदार बर्क यांनी आरोप केला की, देशामध्ये मशिदी तोडून मंदिरे बांधली जात आहेत. (अशी विधाने करतांना बर्क यांनी पुरावे द्यावेत ! – संपादक) मुसलमानांवर जर अत्याचार होत असतील, तर ते भाजपला समर्थन कसे देतील ? भाजप देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहे. आपल्याला ते नष्ट करायचे आहे.
राममंदिर पर शफीकुर्रहमान बर्क का बड़ा बयान
‘मस्जिद को तोड़कर मंदिर बना दिया, यह नाइंसाफी है’
‘मस्जिद को तोड़कर मंदिर बनाना कानून के खिलाफ’#RamMandir #Ayodhya @Drbarq @Kundan_Jamaiyar pic.twitter.com/B95p27sTdl— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) October 5, 2023
संपादकीय भूमिकायाला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ? |