महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत होणार !

मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी मुंबईत झालेल्या ‘कामकाज सल्लागार समिती’च्या महत्त्वाच्या बैठकीत हे अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत होईल, असे निश्चित करण्यात आले. बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सविस्तर चर्चा झाली. आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण ३ आठवडे चालणार आहे. या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न, कर्जमाफी, आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पहाता हे ३ आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध सूत्रांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची सिद्धता केली असून सत्ताधारी पक्षही विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.