मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी ‘मुंबई मेट्रो’ हे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळेग्रामीण भागातील उत्पादनांना मुंबईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ‘दुग्धजन्य पदार्थ विक्री कक्षाच्या उद्घाटन’प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई मेट्रो-३ ही शहराची नवी जीवनवाहिनी आहे. आशियातील सर्वांत लांब एकेरी भूमीगत मेट्रो आहे. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी बनवलेले दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ आता मुंबईसारख्या बाजारपेठेत या माध्यमातून उपलब्ध होतील. मेट्रो स्थानकांवरील अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.