
अमृतसर (पंजाब) – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ‘अकाल तख्त’कडून ‘गुरु द्रोही’ (गुरूंचे विरोधी) आणि ‘खालसा पंथ विरोधी’ ठरवण्यात आले आहे. अकाल तख्त हे शिखांचे सर्वोच्च धार्मिक आणि सर्वोच्च पीठ आहे. अकाल तख्तने राज्यातील सर्व शिख आमदार आणि पंजाब सरकारचे मंत्रीमंडळ यांना एका धर्मनिंदाविरोधी कायद्याच्या संदर्भात २९ जून या दिवशी अकाल तख्तसमोर उपस्थित रहाण्याचे समन्स प्रसारित केले आहे. अमृतसरमध्ये ‘पाच सिंह साहिबान’ (शीख धर्मगुरु) यांच्यात बैठक झाल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी कुलदीप सिंह गरगज्ञ यांनी ‘फसील’वरून (अकाल तख्तच्या व्यासपिठावरून) हा आदेश सुनावला.
काय आहे प्रकरण ?
अकाल तख्तच्या म्हणण्यानुसार एका व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मान शीख गुरूंच्या चित्रांवर मद्य शिंपडतांना दिसतात. याला शीख धार्मिक भावनांचा अपमान मानण्यात आले. मुख्यमंत्री मान यांनी हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) वापरून बनवलेला असल्याचे सांगितले. अकाल तख्तने त्यांना या दाव्याचा पुरावा मागितला; परंतु ‘आवश्यक माहिती किंवा प्रयोगशाळांची नावे त्यांनी दिली नाहीत’, असे अकाल तख्तचे म्हणणे आहे.
अकाल तख्तने सांगितले की, भारत सरकारमान्य दोन प्रयोगशाळांकडून पडताळणी करून घेतली असता व्हिडिओ बनावट किंवा एआयनिर्मित नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मान यांनी अकाल तख्तसमोर चुकीची माहिती दिली, असा निष्कर्ष काढण्यात आला.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी