राष्‍ट्राभिमान आणि सेवेची आवड असलेला ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा नागपूर येथील कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी (वय १५ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१८ मध्‍ये ‘कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आला असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५५ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५६ टक्‍के झाली आहे. त्‍याच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, त्‍याची साधनेची तळमळ आणि त्‍याच्‍यातील भाव यांमुळे आता त्‍याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.७.२०२३)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नागपूर येथील कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी याचा उद्या, श्रावण कृष्‍ण एकादशी (१०.९.२०२३) या दिवशी १५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई सौ. गौरी जोशी यांना त्‍याची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रीवल्लभ जोशी

कु. श्रीवल्लभ जोशी याला १५ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

१. ‘कु. श्रीवल्लभ शाळेत जातांना टिळा लावतो.

२. चांगला वक्‍ता असणे 

तो चांगला वक्‍ता आहे. त्‍याला कुठल्‍याही विषयाचा सखोल अभ्‍यास करण्‍यास आवडते. मागील वर्षी त्‍याने एका वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत ‘आझाद हिंद सेना’ याविषयी उत्‍स्‍फूर्तपणे विषय मांडला आणि प्रथम क्रमांक मिळवला. त्‍याने या स्‍पर्धेत मित्रांनाही साहाय्‍य केले.

सौ. गौरी जोशी

३. तो उत्तम बासरीवादक आहे.

४. तो सद़्‍गुरु आणि संत यांच्‍याशी अतिशय नम्रपणे बोलतो. तो त्‍यांनी काही सांगितले, तर लगेच आज्ञापालनही करतो.

५. व्‍यष्‍टी साधना

तो स्‍वतःवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढतो आणि नामजप करतो. त्‍याच्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या प्रयत्नांत पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे.

६. राष्‍ट्राभिमान

१५ ऑगस्‍टच्‍या दिवशी श्रीवल्लभचे मित्र तिरंगा झेंडा विकत घेतात आणि दुसर्‍या दिवशी ते इतरत्र टाकतात. तेव्‍हा श्रीवल्लभने त्‍याच्‍या मित्रांना तसे करण्‍यापासून थांबवले.

७. सेवेची आवड

आमच्‍या घरी साधक अथवा संत रहायला येतात. तो त्‍यांची सेवा करतो, उदा. त्‍यांचे कपडे धुलाईयंत्रामध्‍ये धुऊन इस्‍त्री करण्‍यास देतो. मला शक्‍य नसल्‍यास दुपारी त्‍यांना अल्‍पाहार करून देतो.

८. त्‍याला स्‍वप्‍नात पूर्वसूचना मिळतात.

– सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (२३.३.२०२३)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.