उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अर्जुन जगदाळे हा या पिढीतील एक आहे !
‘चि. अर्जुन ओंकार जगदाळे याची त्याची आई आणि आजी यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. जन्मापूर्वी
अ. ‘माझ्या सासूबाई प्रतिदिन ‘सुनेच्या पोटी जन्माला येणार्या बाळाकडून ईश्वरी राज्यात सेवा घडू दे’, अशी प्रार्थना करत असत.
२. जन्म ते ६ मास
अ. अर्जुन २ मासांचा असतांना खोलीत असलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्राकडे एकटक पाहून आवाज करत असे. त्या वेळी ‘तो दत्तगुरूंशी बोलत आहे’, असे मला जाणवायचे.
आ. अर्जुनला रात्री झोपवतांना आम्ही श्री दत्तगुरूंचे भजन म्हटले की, तो रडणे थांबवून शांत झोपत असे.
३. ७ मास ते १ वर्ष

३ अ. देवाची आवड : अर्जुन ७ मासांचा असतांना त्याला ‘‘कान्हा कुठे आहे ?’’, असे विचारल्यावर तो देवघरात जाऊन श्रीकृष्णाचे चित्र दाखवायचा. त्या वेळी आम्ही देवघरात ठेवलेल्या गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्रालाही तो नमस्कार करत असे.
४. वय १ ते २ वर्षे
४ अ. साधकांशी जवळीक साधणे
१. अर्जुन साधकांशी त्यांच्याशी जुने ऋणानुबंध असल्यासारखे प्रेमाने वागतो.
२. तो सेवाकेंद्रातील स्वयंपाकघरात जाऊन साधिकांकडे खाऊ मागतो.
४ आ. एकदा मी सेवेनिमित्त कोल्हापूर येथील सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा तिथे पू. सदाशिव (भाऊ) परब (सनातनचे २६ वे संत, वय ८५ वर्षे) होते. त्यांना पाहिल्यावर अर्जुन क्षणात त्यांच्याकडे झेपावला.
४ इ. देवता आणि गुरु यांच्याप्रती भाव
१. तो स्वतःहून देवघरात जाऊन साष्टांग नमस्कार करतो.
२. एकदा त्याची आजी पूजा करत असतांना त्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीला ‘माझा कान्हा’, असे म्हणत प्रेमाने कुरवाळले.
३. तो सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे रथारूढ असलेल्या छायाचित्राकडे एकटक पहातो.’
– सौ. ऐश्वर्या ओंकार जगदाळे (चि. अर्जुनची आई), कोल्हापूर
५. वय २ ते ४ वर्षे
५ अ. समंजस : ‘अर्जुनची आई नोकरी करते. ती घरातून कार्यालयात जाण्यासाठी निघत असतांना अर्जुन तिला त्रास देत नाही.
५ आ. अर्जुनला झाडे, पक्षी आणि प्राणी यांविषयी आपुलकी आहे. तो आमच्या घराच्या अंगणातील तुळशीच्या रोपाला हळूवारपणे कुरवाळतो.
५ इ. प्रार्थना करणे : तो नियमित गुरुदेवांना ‘माझा दिवस आनंदात जाऊ दे’, अशी प्रार्थना करतो. तो श्री गणपतीच्या चित्राला साष्टांग नमस्कार करून ‘मला चांगली बुद्धी दे’, अशी प्रार्थना करतो.
५ ई. धर्माभिमान
१. अर्जुनला कपाळावर कुंकवाचा टिळा लावायला आवडतो.
२. अर्जुनला भगव्या झेंड्याविषयी विशेष आकर्षण आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीच्या वेळी सर्व ठिकाणी अक्षता वाटप होत होते. आमच्या वसाहतीतही अक्षता वाटपाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत अर्जुनने झेंडा हातात पकडून ठेवला होता.
६. स्वभावदोष
जेवतांना त्रास देणे’
– सौ. नम्रता जगदाळे (चि. अर्जुनची आजी (वडिलांची आई) कोल्हापूर
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २५.३.२०२६)
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !