उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. संस्कृती चिद्रावार ही या पिढीतील एक आहे !
वैशाख कृष्ण चतुर्थी (५.५.२०२६) या दिवशी कु. संस्कृती गजानन चिद्रावार हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे कुटुंबीय आणि आणि साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. संस्कृती चिद्रावार हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. साधनेचे केलेले प्रयत्न : ‘मी पोटातील बाळाला नामजप शिकवण्याचा प्रयत्न करत असे. गरोदरपणात फिरत असतांना ‘श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांना प्रदक्षिणा घालत आहे’, असा भाव ठेवत असे.
१ आ. गर्भधारणा झाल्यावर स्वतःमध्ये झालेले पालट
१. माझ्या मनातील भगवंताविषयीची ओढ वाढली.
२. मला बर्याच प्रसंगांत स्थिर रहाता येऊ लागले.
३. माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण न्यून झाले.
४. माझे आनंदी रहाण्याचे प्रमाण वाढले.
२. जन्मानंतर
२ अ. वय १० मास ते १ वर्ष
१. संस्कृती देवघराकडे आणि पूजेच्या साहित्याकडे जात असे.
२. ती ‘गुरु ध्यानी आम्हा चैतन्य मिळो’, हे गीत आणि ‘ज्योत से ज्योत जगाओ’, ही गुरूंची आरती ऐकून झोपत असे.
३. तिला गंध लावतांना ‘कृष्ण, कृष्ण’, असे म्हटल्यावर ती स्थिर रहात असे.
२ आ. वय १ ते २ वर्षे
२ आ १. देवाची ओढ
अ. एकदा संस्कृती देवाजवळ चटई घेऊन बसली. तेव्हा ती हात जोडून ओठ हालवत होती आणि त्यानंतर तिने देवाला नमस्कार केला.
आ. तिचे वडील सकाळी उठल्यावर श्रीकृष्णाच्या पाया पडतात. हे पाहून तीही नमस्कार करायला लागली.
इ. एकदा श्रीकृष्णाच्या चित्राजवळ जाऊन तिने त्याच्या चरणाला हात लावला आणि तोच हात स्वतःच्या कपाळावर लावला. असे तिने २ – ३ वेळा केले.
ई. एकदा सकाळी माझी देवपूजा आणि आरती झाल्यावर तिने मला नामजपाची माळ आणून दिली. त्यानंतर मी संध्याकाळी दिवा लावला. तेव्हा त्या वेळीही तिने मला नामजपाची माळ आणून दिली.
उ. एकदा रात्री ती झोपेतून उठून रडायला लागली. तेव्हा मी तिला श्रीकृष्णाला प्रार्थना करायला लावली. (मी प्रार्थना म्हटली आणि तिने हात जोडून ती ऐकली अन् नमस्कार केला.) त्यानंतर ती रात्रभर शांत झोपली.
ऊ. तिला भ्रमणभाषवरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवल्यावर ती त्यांच्या चरणांवर डोके टेकवते आणि मलाही नमस्कार करायला लावते.
२ आ २. मी घरात केर काढत असतांना ती मला लगेच सुपली आणून देते.
२ आ ३. एकदा तिचे वडील जेवण झाल्यावर गोळी घ्यायला विसरले, तेव्हा तिने खुणेने त्यांना गोळी घेण्याची आठवण करून दिली.
२ आ ४. आम्हाला कोणालाही सूर्यनमस्कार करतांना पाहिल्यावर तीही तसे करण्याचा प्रयत्न करते.
२ आ ५. तिची अंघोळ झाल्यावर ती ‘मला कुंकू लावा’, असे म्हणते.
२ इ. वय ३ ते ४ वर्षे
१. एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना तिने त्यातील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहिले आणि ती मला म्हणाली, ‘‘आई, आपण प.पू. गुरुदेवांकडे जाऊया ना गं !’’ तिने कधीच ‘मामा किंवा मावशी यांच्याकडे जाऊ’, असे म्हटले नव्हते.
२. संस्कृतीची एखादी चूक झाल्यावर मी तिला ‘क्षमा माग’, असे सांगितल्यावर ती लगेच क्षमा मागते.
३. एकदा तिला पुष्कळ झोप आली होती. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘प्रार्थना करून झोप.’’ तेव्हा ती लगेच ‘हो’ म्हणून प्रार्थना करून झोपली.
२ ई. वय ६ वर्षे
२ ई १. उत्तम आकलनक्षमता
२ ई १ अ. मराठी भाषा आवडणे आणि इंग्रजी शाळेत शिकत असूनही मराठी वाचन करायला लवकर शिकणे : संस्कृतीला मराठी भाषेतील जोडशब्द, मात्रा, ‘उ’कार, हे काहीही शिकवले नव्हते. एकदा तिने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ घेतला आणि त्यातील ‘भक्तराज महाराज’, हे शब्द वाचले. ती इंग्रजी शाळेत शिकत होती. तेव्हा ती वडिलांना म्हणायची, ‘‘मला ही भाषा आवडत नाही. मला मराठी भाषेत शिकायचे आहे.’’ ती इंग्रजी शाळेत शिकत असूनही मराठी वाचन पुष्कळ लवकर शिकली. पहिलीच्या वर्गात ‘सेमी’ मराठी शाळेत गेल्यावर ती दोनच मासांत मराठी वाचन करायला शिकली.
२ ई १ आ. तिच्या बहिणीला ‘संस्कृत’ हा विषय आहे. ती संस्कृत भाषेचा अभ्यास करत असतांना संस्कृतीही ते संस्कृत शब्द लक्षात ठेवत असते.
२ ई २. जिज्ञासू वृत्ती : संस्कृती बर्याच वेळा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ पहात असते. ती त्या ग्रंथातील प्रत्येक पानाचे पुष्कळ छान निरीक्षण करते. जर त्या पानावरील तिला काही समजले नाही, तर ती मला त्याविषयी प्रश्नही विचारते.
२ ई ३. संस्कृती म्हणते, ‘‘प.पू. गुरुदेवांचे घर पहावे’, असे मला वाटते.’’
२ ई ४. ‘प.पू. गुरुदेव आपल्या शरिरात आहेत’, असे तिला जाणवते.
२ उ. वय ८ ते ९ वर्षे
२ उ १. शाळेतील शिक्षकांना तिचे बोलणे पुष्कळ आवडते. काही शिक्षक म्हणतात, ‘‘ती एवढी गोड आहे की, तिला रागवावेसे वाटत नाही.’’
२ उ २. समजूतदारपणा : आमच्यात (तिच्या आई-बाबांमध्ये) काही वाद झाला, तर ती दोघांना पुष्कळ चांगल्या प्रकारे समजावून सांगते आणि दोघांनाही एकमेकांची क्षमा मागायला सांगते. त्या वेळी ‘तिच्या माध्यमातून गुरु आमच्या समवेत आहेत’, असे मला वाटते.
२ उ ३. सेवेची आवड : एकदा आम्ही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा ती प्रत्येक वेळी माझ्या समवेत सेवा करत असे. इतर बालसाधक तिला खेळायला बोलवायचे, तरी ती त्यांच्या समवेत खेळायला जात नसे. ‘तिला अधिकाधिक सेवेतच रहावे’, असे वाटत होते. ‘ती सेवा करत आहे’, हे पाहून इतरही बालसाधकही तिच्या समवेत सेवा करत होते.’
– सौ. उज्ज्वला चिद्रावार (संस्कृतीची आई), परभणी
२ ऊ. वय १० ते ११ वर्षे
२ ऊ १. प्रेमभाव : ‘संस्कृतीमध्ये प्रेमभाव पुष्कळ आहे. कोणाला काही त्रास होत असल्यास ते तिच्या लगेच लक्षात येते आणि ती त्यांच्याशी प्रेमाने बोलते.’ – कु. चैताली डुबे (संस्कृतीची मावशी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), संभाजीनगर
२ ऊ २. मधुर बोलणे : ‘मी संस्कृतीच्या साधनेचा आढावा घेते. संस्कृतीचा आवाज पुष्कळच गोड आहे. ती बोलत असतांना ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.
२ ऊ ३. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. संस्कृतीला आढावा देण्याची पुष्कळ तळमळ आहे. ती प्रामाणिकपणे, तळमळीने आणि भावपूर्ण आढावा देते.
आ. तिला तिच्या चुका लक्षात आणून दिल्यावर ती त्या लगेच स्वीकारते.’
– सौ. स्वाती श्रीनिवास दिवाण (साधिका), परभणी
२ ऊ ४. ‘तिच्यामध्ये साधकत्व आहे’, असे मला जाणवते. ती सर्वांशी आदराने आणि नम्रतेने वागते.
२ ऊ ५. ‘संस्कृतीमध्ये साधना करण्याची आवड आणि ईश्वरप्राप्तीची तळमळही आहे’, असे मला जाणवते.
२ ऊ ६. ती अंतर्मुख असते.’
– सौ. श्वेता देशपांडे (साधिका), नांदेड
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.४.२०२६)
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !
शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !
शांत, नम्र आणि देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोथरूड, पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय १५ वर्षे) !
देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अर्जुन ओंकार जगदाळे (वय ४ वर्षे) !
साधनेची ओढ असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची वरळी, मुंबई येथील कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) !
देवाची आवड असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तुळजा अनिल साळुंखे (वय २ वर्षे) !