रामनाथी आश्रमात झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी श्री. प्रशांत पांडुरंग तरकसबंद यांना आलेली अनुभूती !

श्री. प्रशांत तरकसबंद

१.‘शिबिरात ‘प्रोजेक्‍टर’च्‍या साहाय्‍याने सेवा करतांना असे वाटत होते की, ती निर्जीव वस्‍तू नसून सजीवच आहे. सेवा चालू असतांना प्रोजेक्‍टर आणि मी अशा आम्‍हा दोघांत संवाद होत होता. सेवेत तोच मला मार्गदर्शन करत होता.

२. मी एका सत्‍संगासाठी बैठककक्षात जाऊन बसलो. तेव्‍हा तेथे ‘एक वेगळीच पोकळी’ जाणवत होती. तिथे असलेली उपकरणे, आसंद्या आणि आम्‍हा साधकांचे देह जे काही आहे, ते सर्व एकच आहेत. सर्व पारदर्शक आणि हलके आहेत’, असे मला जाणवत होते.

३. आरंभी श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी भाववृद्धीचा प्रयोग घेतला. त्‍या वेळी माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. माझ्‍या डोळ्‍यांतून सतत पाणी वहात होते.

४. बालसाधकांच्‍या सत्‍संगामध्‍ये कु. शर्वरी कानस्‍कर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे) बोलत होती. तेव्‍हा गुरुमाऊलींप्रती पुष्‍कळ भाव दाटून येत होता आणि मला रडू येत होते.’

– श्री. प्रशांत पांडुरंग तरकसबंद, मुंबई (३०.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक