रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिर चालू असतांना पुणे येथील सौ. विदुला देशपांडे (वय ५८ वर्षे) यांच्‍या खांद्यावर फुलपाखरू येऊन बसणे

सौ. विदुला देशपांडे

‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात एक शिबिर’ झाले. १३.९.२०२२ या दिवशी आमचा गट गोलाकार बसून प्रसंगाचा सराव करत असतांना एक लहान तपकिरी रंगाचे फुलपाखरू गोलाच्‍या मध्‍यभागी येऊन बसले. नंतर ते बराच वेळ भिंतीवर बसले होते. १४.९.२०२२ या दिवशी  सराव चालू असतांना ते फुलपाखरू सकाळी ११:३० वाजता माझ्‍या खांद्यावर येऊन बसले. त्‍यानंतर दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद घेतल्‍यानंतर ताट-वाटी धुतांना ते उडून गेले.’

– सौ. विदुला पुरुषोत्तम देशपांडे (वय ५८ वर्षे), पुणे (३०.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक